लोकनेते कै शिवाजीराव चालुक्य यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त मुलींना सायकल वाटप

0

लोहारा/प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्याचे लोकनेते कै.शिवाजीराव (दादा) चालुक्य यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त लोहारा तालुक्यातील होळी येथे गरजु आणि हुशार मुलींना सायकल वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा युवा नेते हर्षवर्धन चालुक्य यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. 

यावेळी जि.प.सदस्य राहुल पाटील यांच्या प्रमुख म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सरोजा बिराजदार उपस्थित होत्या. यावेळी वसंतराव नाईक प्राथमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय येथे युवा नेते संतोष राठोड, ग्रा.पं.सदस्य केशव सरवदे, विजय राठोड प्राचार्य डोंबाळे, डी.के.चव्हाण, एस‌.वाय. कांबळे, रविंद्र चव्हाण चेअरमन लक्ष्मण राठोड आदी उपस्थित होते. 

यावेळी हर्षवर्धन चालुक्य मित्रमंडळाच्या वतीने या स्तुत्य उपक्रमाच आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील नागरीक आणि कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top