लोहारा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर

0
लोहारा/प्रतिनिधी
नुकतीच लोहारा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकी झाल्या आहेत.आता नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीचा मार्गही मोकळा झालेला आहे. दि.4 फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जाहिर केला आहे. नगराध्यक्षपदासठी मंगळवार दि.8 फेब्रुवारी दुपारी 2 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात येणार आहे. याच दिवशी या नामनिर्देशनपत्रांची छाननी करणे, वैध नामनिर्देशनपत्राची यादी त्याच दिवशी जाहीर करण्यात येईल. तर नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची शेवटची दि.11फेब्रुवारी आहे. दि.14 रोजी पिठासीन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन प्राप्त उमेदवाराच्या नावाची यादी वाचुन निवडणूक प्रक्रिया व निवडणूक निकाल घोषित करण्यात येणार आहे. लोहारा नगरपंचायतीत सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या शिवसेनेच्या कोणत्या नगरसेवकाच्या गळ्यात अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची माळ पडणार? या बाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून या निवडीसाठी शिवसेनेमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गसाठी सुटले असल्याने सर्वच नगरसेवकांना नगराध्यक्षपदाची स्वप्न पडत आहेत. नगराध्यक्षपदाच्या निवडीचे अधिकार माजी खा.प्रा.रविंद्र गायकवाड व आ.ज्ञानराज चौगुले यांच्याकडे आहे. त्यामुळे माजी खा.प्रा. रविंद्र गायकवाड व आ.ज्ञानराज चौगुले कोणत्या नगरसेवकाच्या नावाला पसंती देतात त्यावरच नगराध्यक्षपदाचे भवितव्य अवलंबून आहे. नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत 17 जागेपैकी शिवसेना 9 राष्ट्रवादीला 2 असे शिवसेना, राष्ट्रवादी युतीला 11 जागेवर विजय मिळवला आहे. शिवसेना-राष्ट्रवादी युतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून शिवसेनेचाच नगराध्यक्ष होणार हे निश्चित आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम व्हॅलेटाइन डे च्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. नगराध्यक्ष पदाची खुर्ची कोणाला गुलाबाचे फुल देणार याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top