Osmanabad news :-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन केले
विश्वरत्न,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज (दि.14) डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.त्याचबरोबर धनंजय शिंगाडे यांच्या वतीने मिठाई वाटप व गरजूंसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले.
जयंतीदिनाचे औचित्य साधून सकाळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व नगर परिषदेचे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे,तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल शिंगाडे,अँड खंडेराव चौरे,नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे,लक्ष्मण माने,आबासाहेब खोत धनंजय राऊत,यांनी अभिवादन केले. त्यानंतर बुद्धवंदना घेण्यात आली.कौस्तुभ दिवेगावर यांनी सर्व उपस्थित बांधवास शुभेच्छा देऊन कोरोना काळात गेली दोन वर्षे जयंतीचा उत्सव साजरा करता आला नाही.जिल्हा दोन वर्षाच्या काळानंतर आज पहिल्याप्रमाणेच मोठ्या उत्साहात जयंती उत्सव साजरा होत आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुसरण करुन या उत्सवाच्या निमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करुन आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन करत केले आहे. जयंतीनिमित्ताने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महामानवास अभिवादन करण्यासाठी जमलेल्या जनसमुदायास मिठाईचे वाटप करण्यात आले.
छाया राहुल कोरे आळणीकर