डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त काळेगाव ता. तुळजापूर येथे विविध ठिकाणी विविध उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले अभिवादन
बातमी संकलन :- प्रकाश साखरे काळेगाव
विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त काळेगाव येथे विविध ठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रतिमेचे पूजन करून ग्रामसेविका शेख मॅडम यांच्या तर्फे गावातील गरजूंना (अपंगांना )किराणा किट चे वाटप करण्यात आले यावेळी उपसरपंच आनंदराव उंबरे पाटील व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले यावेळी पोतदार सर, गायकवाड सर, आदी शिक्षक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते
भिमनगर काळेगाव येथे प्रकाश साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर साखरे, नंदकुमार साखरे,कैलास साखरे यांनी ध्वजारोहण करून प्रतिमेचे पुजन केले व सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली या वेळी ग्रामसेविका शेख मॅडम यांनी वेळात वेळ काढून भिमनगर येथील कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. प्रतिमेचे पुजन झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली व खावू वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली