google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

0
भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

उस्मानाबाद,दि.14-
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा शहर शाखेच्या वतीने शहरातील शिवाजीनगर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीचे औचित्य साधून शुक्रवार, 15 एप्रिल रोजी शहरातील शिवाजीनगर येथे ई-श्रम कार्ड वाटप तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष अमोल पेठे यांनी दिली.

जयंतीनिमित्त आज (दि.14) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन भाजपा शहराध्यक्ष राहुल काकडे व अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष अमोल पेठे यांच्या हस्ते करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आनंद भालेराव, सचिन लोंढे, राजाभाऊ गायकवाड, सदानंद आकुसकर, केशव गायकवाड, मालोजी साळुंके, अक्षय भालेराव, लखन बगाडे, नसरुद्दीन शेख तसेच शिवाजीनगर प्रभाग क्रमांक दहामधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top