google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 महावितरण सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने महामानवांस अभिवादन

महावितरण सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने महामानवांस अभिवादन

0
महावितरण सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने महामानवांस अभिवादन

उस्मानाबाद,दि. १४ -
महावितरण सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.

या निमित्त पुणे येथील ॲड.शीतल चव्हाण यांचे व्याख्यान आयोजित केले होते. ॲड.चव्हlण  यांनी दोन्ही महापुरुषाचे तत्कालीन विचार आजही कसे लागू पडतात हे विशद केले. समता, स्वातंत्र्य बंधुता आणि सत्यशोधन याचा वापर तळागाळातल्या लोकांसाठी कसा करावा याचे विवेचन परखड आणि मोजक्या शब्दात त्यांनी मांडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून मंडल कार्यालयाचे लेखा व्यवस्थापक प्रवीण बगाडे, मानवसंसाधन व्यवस्थापक सौ. प्रिया शितोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता रवींद्र महाद्वार, उपव्यवस्थपक (लेखा) नामदेव माळी, सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता मुरलीधर हंबीरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदेश माळlळे यांनी केले. आभारप्रदर्शन वैभव मगर यांनी केले. कार्यक्रमास वीज कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top