google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 लहुजी विद्रोही सेनेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

लहुजी विद्रोही सेनेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

0
Osmanabad news :- 

लहुजी विद्रोही सेनेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी



उस्मानाबाद,दि. 14-
लहुजी विद्रोही सेनेच्या वतीने विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शहरातील लहुजी वस्ताद साळवे चौक येथे आज (दि.14) उत्साहात साजरी करण्यात आली.  जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन लहुजी विद्रोही सेनेच्या संस्थापक सचिव तथा भारतीय जनता पार्टीच्या मराठवाडा उपाध्यक्ष पूजा देडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना पूजा देडे म्हणाल्या, जोपर्यंत समाजातील वंचित, शोषित घटकांना जातींना न्याय मिळणार नाही, समता प्रस्थापित होणार नाही तोपर्यंत बाबासाहेबांच्या विचारांचे सार्थक होणार नाही. ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून उपेक्षित आणि शोषित घटकांच्या प्रश्नावर लहुजी विद्रोही सेनेच्या माध्यमातून चळवळ उभी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग लाटे, लहुजी विद्रोही सेनेचे जिल्हाध्यक्ष सोपान उकांडे, तुलसी महिला पतसंस्थेच्या चेअरमन नंदा पुनगडे, विश्व हिंदू परिषदेच्या प्रभावती मार्डीकर, भाजपा युवती मोर्चाच्या देवकन्या गाडे, तालुकाध्यक्ष रामेश्वर देडे, आकाश खंडागळे, शहराध्यक्ष प्रल्हाद केंदळे, शहर उपाध्यक्ष राकेश खंदारे, भाजपा शहराध्यक्ष संदीप इंगळे, अजय यादव, मनीषा देडे, मनीषा सुतार, लक्ष्मी डावकरे, संगीता गायकवाड, अनिता क्षीरसागर, उदय देशमुख, सहदेव गायकवाड, सत्यवान क्षीरसागर, ओंकार देडे, चैतन्य देडे, अरुण देडे, राजेंद्र आडसूळ आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top