google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ. आंबेडकर मध्यवर्ती जयंती मिरवणुकीचेरामराजे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

डॉ. आंबेडकर मध्यवर्ती जयंती मिरवणुकीचेरामराजे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

0
Osmanabad news :- 

डॉ. आंबेडकर मध्यवर्ती जयंती मिरवणुकीचे
रामराजे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

उस्मानाबाद दि.१४ (प्रतिनिधी) - 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समारोह समितीच्यावतीने डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यास लोकमंगल फाऊंडेशनचे संचालक रामराजे पाटील यांच्या हस्ते दि.१४ एप्रिल रोजी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
उस्मानाबाद शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उपस्थितांना लाडूचे वाटप करण्यात आले. तर भीम नगर येथील क्रांती चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या भव्यदिव्य मिरवणुकीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लेझीम पथक, डीजेच्या निनादात व फटाक्यांची  अतिषबाजी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समारोह समिती मंडळाचे मार्गदर्शक विदयानंद बनसोडे, प्रविण बनसोडे, मोहन बनसोडे, मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब मस्के, कार्याध्यक्ष रणजित गायकवाड, उपाध्यक्ष  सिध्दोधन सोनवणे, मंडळाचे कोषाध्यक्ष कैलास शिंदे, सचिव रोहित लगाडे, मिरवणुक प्रमुख श्रीकांत मटकीवाले, मंडळाचे प्रमुख सल्लागार सतिश घोडेराव. डॉ. आदिनाथ राजगुरु, दयानंद वाघमारे, के.के. गाडे, राजाभाऊ जानराव, बाबासाहेब बनसोडे, संयोजक किशोर बनसोडे, सदस्य सिध्दार्थ बनसोडे, अशोक बनसोडे आदीसह भिमसैनिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही मिरवणूक क्रांती चौक मार्गे मारवाडी गल्ली, काळा मारुती चौक, नेहरू चौक, देशपांडे स्टॅन्ड, ताजमहाल टॉकीज चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी या मिरवणुकीची सांगता सार्वजनिक बुद्ध वंदनेने करण्यात आली.

छाया राहुल कोरे आळणीकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top