Osmanabad news :-
उस्मानाबाद, दि. 27 - तालुक्यातील बेंबळी येथे कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्प अभिनव विकसित शेतकरी उत्पादक कंपनीच्यावतीने शेतीशाळा पार नुकतीच पार पडली. कृषी संजीवनी मोहिम व बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत आयोजित शेतीशाळेत शेतकर्यांना सोयाबीन बियाण्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी आत्मा प्रकल्पाचे उपसंचालक बालाजी किरवले, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नागेश उगलमुगले, सी. डी. पाटील, आर. डी. पाटील, कृषी सहाय्यक नितीन जाधव, अभिनव शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक केदार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात किरवले यांनी, सोयाबीन लागवड तंत्रज्ञान बीजप्रक्रिया, बियाण्याची उगवण क्षमता, माती नमुने, मूलद्रव्याचा वापर, एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.
तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नागेश उगलमुगले यांनी, जागतिक बँक अर्थसहाय्य, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन या प्रकल्पाविषयी मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक नितीन जाधव यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कंपनीचे संचालक केदार यांनी केले. शेतीशाळेत मान्यवरांच्या हस्ते गावातील शेतकरी तानाजी भोसले, संजय नळेगावकर, प्रशांत पाटील, अतुल पाटील, रवीशंकर पाटील, निळकंठ गिरवलकर, राहुल गिरवलकर आदी शेतकर्यांना सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले.