धान्य चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी अटकेत, आंबी पोलिसांची कारवाई

0

धान्य चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी अटकेत, आंबी पोलिसांची कारवाई

अंबी पोलीस ठाणे : उंडेगाव, ता. परंडा येथील सिमाबाई शेरे यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 12- 17.06.2022 रोजी दरम्यान तोडून घरातील 40 कि.ग्रॅ. गहु व 25 कि.ग्रॅ. ज्वारी भरुन ठेवलेल्या धाण्याच्या पिशव्या चोरुन नेल्या होत्या. यावरुन शेरे यांनी अंबी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 71/2022 हा भा.दं.सं. कलम- 454, 457, 380 अंतर्गत नोंदवला आहे. गुन्हा तपासादरम्यान अंबी पो.ठा. चे सपोनि- श्री. आशिष खांडेकर, पोना- सिध्देश्वर शिंदे, सम्राट माने, पोकॉ- सतीष राऊत, राहूल गायकवाड यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे उंडेगाव ग्रामस्थ- सुनील अरविंद शेरे, प्रवीण भक्तीदास शेरे यांना ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून नमूद चोरीचे धान्य जप्त केले आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top