रस्त्यात जॅक टाकून वाहन लुटणारा अटकेत , वाशी पोलीस ठाण्यांची कारवाई

0
रस्त्यात जॅक टाकून वाहन लुटणारा अटकेत 

Osmanabad news :- 

वाशी पोलीस ठाणे : कुल्काचेर्ला, जि. विकाराबाद, राज्य- तेलंगण येथील नविन रामलु केतावत, वय 19 वर्षे हे स्विफ्ट डिझायर कार क्र. टी.एस. 34 ई 3768 ने कुटूंबीयांसह तेलंगण- शिर्डी असा प्रवास करत असताना दि. 13.01.2021 रोजी रात्री 03.00 वा. सु. वाशी येथील इंदापुर फाटा येथे आले असता त्यांच्या कारसमोर कोणीतरी जॅक अचानक फेकल्याने चालकाचे कारवरील नियंत्रन सुटून कार रस्त्याबाजूच्या खड्ड्यात जाउन पलटली. यावेळी कारमधील केतावत यांसह त्यांचे कुटूंबीय जखमी झाल्याने त्यांना मदत करण्याच्या बहान्याने तीन- चार अनोळखी पुरुषांनी केतावत यांसह त्यांच्या कुटूंबीयांना मारहान करुन केतावत यांच्या आई व बहिणीच्या गळ्यातील एकुण 75 ग्रॅम सुवर्ण दागिने जबरीने काढून घेउन तेथून पसार झाले. यावर नविन केतावत यांनी वाशी पोलीस ठाणे गाठून गुन्हा क्र. 69 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 394, 395, 397 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
गुन्हा तपासादरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पो.ठा. चे पोनि- श्री. दळवे, पोउपनि- श्री. काळे, फंड, पोना- पठाण, लाटे, पोकॉ- सय्यद, करवर, सुरवसे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे नमूद गुन्ह्यातील आरोपी- प्रकाश नाना पवार उर्फ ढाण्या, रा. पारधी पिढी, तेरखेडा यास आज दि. 23 जून रोजी राहत्या परिसरातून अटक केली आहे. गुन्ह्यातील त्याच्या उर्वरीत साथीदारांचा पोलीस शोधा घेत असून गुन्ह्याचा तपास पोउपनि- श्री.काळे हे करत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top