वाशी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्वावर शिल्पनिदेशक पदासाठी भरती
उस्मानाबाद,दि.27(जिमाका):- वाशी तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्प निदेशक तारतंत्री (वायरमन) व्यवसायाची रिक्त जागा अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर पद भरावयाचे आहे. हे पद दि.14 नोव्हेंबर 2018 च्या शासन निर्णयानुसार भरावयाचे आहे.
इच्छुक उमेदवारांनी शुक्रवार, दि.03 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी ठिक 12.00 वाजता मुळ प्रमाणपत्रासह उपस्थित रहावे, असे वाशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी कळविले आहे.