अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी ई.बी.सी. तपासणी कॅम्पचा लाभ घ्यावा : डी.व्ही.सुळ

0

अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी ई.बी.सी. तपासणी कॅम्पचा लाभ घ्यावा : डी.व्ही.सुळ

 

उस्मानाबाद,दि.27(जिमाका):- उस्मानाबाद जिल्ह्यातील अशासकीय अनुदानित शासन मान्य उच्च माध्यमिक विद्यालयाचे कनिष्ठ महाविद्यालये, वरिष्ठ महाविद्यालयास जोडून असलेले कनिष्ठ महाविद्यालये यांचे 2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या इयत्ता अकरावी आणि बारावी विद्यार्थ्यांचे ई.बी.सी. सवलतीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी पुढीलप्रमाणे कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

उस्मानाबाद तालुक्यात दि.30 जानेवारी रोजी लेखाधिकारी (शिक्षण) कार्यालय, तुळजापूर तालुक्यात दि.31 जानेवारी रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूल तुळजापूर, उमरगा आणि लोहारा तालुक्यात दि.01 फेब्रुवारी रोजी भारत विद्यालय उमरगा, कळंब तालुक्यात दि.02 फेब्रुवारी रोजी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब, भूम आणि वाशी तालुक्यात दि.03 फेब्रुवारी रोजी शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय भूम आणि परंडा तालुक्यात दि.08 फेब्रुवारी रोजी शिक्षण महर्षी रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा येथे या कॅम्पचे आयोजन केले जाणार आहे.

ई.बी.सी. तपासणीकरिता लातूर विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी दिलेली 2022-23 च्या संच मान्यतेच्या छायांकित सुस्पष्ठ प्रत साक्षांकनासह सादर करावी. तसेच उस्मानाबाद जि.प.चे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी 2022-23 मध्ये केलेल्या पटपडताळणी अहवालाची सत्य प्रत, यु डायसचे माहितीची सत्य प्रत, विहीत नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव आणि विद्यार्थ्यांच्या प्रस्तावासोबत सक्षम प्राधिकारी यांच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्रासह प्रस्ताव वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या दिनांकास ई.बी.सी. कॅम्पच्या स्थळी माहितगार कर्मचाऱ्यांसह उपस्थित राहून प्रस्तावाची तपासणी करुन घ्यावी. या कॅम्पचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन लेखाधिकारी (शिक्षण) डी.व्ही.सुळ यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top