पत्रकारांना मिळणार विमा संरक्षण , उद्या सन्मान, विमा वितरण सोहळा व कार्यशाळा , व्हाईस ऑफ मीडियाच्या जिल्हा शाखेचा पुढाकार

0

पत्रकारांना मिळणार विमा संरक्षण , 
उद्या सन्मान, विमा वितरण सोहळा व कार्यशाळा , व्हाईस ऑफ मीडियाच्या जिल्हा शाखेचा पुढाकार

उस्मानाबाद, दि. 25 - प्रजासत्ताक दिन व पत्रकार दिनानिमित्त व्हाईस ऑफ मीडिया या देशपातळीवर कार्यरत असलेल्या पत्रकार संघटनेच्या वतीने गुरूवार, 26 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सांजा रोडलगत असलेल्या आर्यन फंक्शन हॉल येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत 11 ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान, पत्रकारांचे विमा संरक्षण कवच तसेच महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदिप काळे हे असणार आहेत.

 उस्मानाबाद-कळंबचे आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, श्री सिध्दीविनायक उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, धनेश्वरी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रतापसिंह पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पाटील दूधगावकर, श्री समर्थ मल्टीस्टेटचे अध्यक्ष विवेक घोगरे उपस्थित राहणार आहेत.


या कार्यशाळेत मान्यवरांच्या हस्ते 11 ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार व 200 पत्रकार बांधवांना विमा कवच व एक विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच उपस्थित पत्रकार बांधवांना व्हाईस ऑफ मीडियाचे राज्याध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजा माने, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष विजय चोराडिया, पत्रकार गृहनिर्माण संस्थेचे राज्याध्यक्ष संजय मालाणी, बीड जिल्हाध्यक्ष विजय मारगुडे, लातूर जिल्हाध्यक्ष बालाजी फड हे मार्गदर्शन करणार आहेत.कार्यक्रमास जिल्ह्यातील पत्रकारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन व्हाईस ऑफ मीडियाच्या जिल्हा शाखा व पत्रकार बांधवांच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top