तेरणा अभियांत्रिकी महाविद्यलयात २१ दिवसाचे नवीन तंत्रज्ञान कौशल्यावर आधारित प्रशिक्षण संपन्न

0

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यलयात २१ दिवसाचे नवीन तंत्रज्ञान कौशल्यावर आधारित प्रशिक्षण संपन्न

उस्मानाबाद : अभियांत्रिकीच्या  मुलांना मिळणाऱ्या रोजगाराचा वाढता आलेख आणि विद्यार्थ्यांचा नवीन तंत्रज्ञान प्रशिक्षण शिकण्यासाठी असणारा ओढा पाहून महाविद्यालय नेहमीच नवनवीन संकल्पना राबवत असते . रोजगारासाठी प्रथम प्राधान्य देणारे अशी ओळख असणाऱ्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात  नौकरीसाठी लागणाऱ्या खास कौशल्याचे  21 दिवसाचे प्रशिक्षण आयोजित केले होते. दिनांक २ जानेवारी २०२३ ते २१ जानेवारी २०२३ असे सलग २१ दिवसाचे प्रशिक्षण तेरणा अभियांत्रिकी
 महाविद्यालयात राबवण्यात आले. सदरचे प्रशिक्षण GTT या कंपनीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते . प्रशिक्षणात तब्बल 400 विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना रोजगारासाठी लागणारे कौशल्य शिकवण्यात आले . यामध्ये बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी चे प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानासाठी लागणारे सॉफ्टवेअर टेस्टिंग, पायथन, सी आणि सी प्लस प्लस   हि कॉम्पुटर ची भाषा शिकवण्यात आली .संपूर्ण प्रशिक्षण हे हॅन्ड्सऑन प्रॅक्टिस असल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून 
यामुळे अभ्यासक्रमात असलेला प्रोजेक्ट करणे ही सोपे  जात असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.   अभियांत्रिकीच्या मुलामध्ये मुळात कौशल्य अंगीकृत करण्याची क्षमता असल्यामुळे प्रशिक्षण मध्ये कोणतीही अडचण आली नाही. आणि त्यांना या प्रशिक्षणाचा रोजगार मिळण्यासाठी उपयोग होणार आहे". असे प्रतिपादन प्रशिक्षक श्री .गौरव सोनी यांनी केले. "मुलांना रोजगार सक्षम करणे आणि येण्याऱ्या कालावधीत रोजगार साठी लागणारे कलाकौशल्य शिकवणे या साठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्न करत आहे". असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी व्यक्त केले . येणाऱ्या कालावधीत मुलांना टीसीएस,इन्फोसिस, हिरो मोटार, मारुती सुझुकी, किर्लोस्कर,विप्रो, मर्सिडीज बेंज अशा प्रकारचे विविध नामांकित कंपनीमध्ये रोजगार मिळण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होईल या प्रशिक्षणाचा उपयोग करून विद्यार्थी जागतिक लेव्हलचे सर्टिफिकेशन्स करू शकतील व नामांकित कंपन्यांच्या प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपली निवड  निश्चित करू शकतील  अशी पुष्टी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी केली .या 21 दिवसाच्या प्रशिक्षणा बद्दल  तेरणा ट्रस्ट चे अध्यक्ष माननीय डॉ. पदमसिंह पाटील साहेब ,ट्रस्टी माननीय आमदार श्री . राणाजगजीतसिंह पाटील साहेब , माननीय श्री . मल्हार पाटील साहेब आणि महाविद्यलयाचे समन्व्यक श्री गणेश भातलवंडे  यांनी प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी यांचे अभिनंदन केले. हे प्रशिक्षण यशस्वी पुणे पार्क पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्राथमिक अशोक जगताप बीएसएफ विभागाचे विभाग डॉ.उषा वडणे तसेच प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे प्रा.प्रदीप पवार, प्रा.अभिजीत बोरकर,प्रा.रणजीत दंडनाईक यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top