पत्रकारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यांवर व्यक्तीवर कडक कारवाई व्हावी; व्हॉइस ऑफ मिडिया वाशी यांच्या वतीने दिले तहसीलदारांना निवेदन

0
पत्रकारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यांवर व्यक्तीवर कडक कारवाई व्हावी; व्हॉइस ऑफ मिडिया वाशी यांच्या वतीने दिले तहसीलदारांना निवेदन

 उस्मानाबाद - रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या यांनी रिफायनरीजच्या विरोधात दिलेल्या बातमी राग धरुन रिफायनरीच्या दलालांनी अंगावर चारचाकी घालून मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यां  रिफायनरी व दलाल आदीं व्यक्तीवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कडक कार्यवाही व्हावी ह्या मागणीसाठी व्हॉईस ऑफ मीडिया वाशी तालुका च्या वतीने तहसीलदार नरसिंग जाधव यांना लेखी निवेदन देण्यात आले. सत्य पत्रकारिता करत असताना पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शासनाने याची दाखल घेऊन पत्रकार संरक्षण कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. 
  ह्यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे वाशी तालुकाध्यक्ष वैभव पारवे उपाध्यक्ष शिवाजी गवारे, कोषाध्यक्ष विशाल खामकर, संघटक विलास गपाट, सदस्य एम.आय. मुजावर, शहाजी चेडे, शोएब काझी, विश्वनाथ जगदाळे, दत्तात्रय भाराटे,विकास तळेकर ई पत्रकार बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top