कृषी महाविद्यालय आळणी गड पाटी येथील विद्यार्थ्यांचा व्यावसायिक तत्वावर भाजीपाला उत्पादन उपक्रम
उस्मानाबाद : कृषी महाविद्यालय आळणी येथील उद्यान विद्या विभागाअंतर्गत व्यावसायिक तत्त्वावर भाजीपाला उत्पादनास सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेत असताना त्यांच्यात उद्योजकता कौशल्य विकसित व्हावे, कृषी पूरक व्यवसायातील संधी, ताकत, कमकुवत, बाजू व धोके त्यांना समजावेत तसेच कृषी शिक्षण घेणारा विद्यार्थी फक्त उत्पादक न बनता उद्योजक बनावा या उद्देशाने महाविद्यालयात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सदर उपक्रम पदवीच्या अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी राबवत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांनी टोमॅटो, कोबी, फुलकोबी, चवळी, ढोबळी मिरची, गाजर, पालेभाज्या जसे की मेथी व कोथिंबीर यामध्ये विद्यार्थी स्वतः भाजीपाल्याचे उत्पादन घेऊन त्याची विक्री करत आहेत.
भाजीपाल्यांमध्ये प्रमुख आकर्षण म्हणजे परदेशी भाजीपाला ब्रोकोली व नव्याने विकसित केलेले कोबीचे वाण रेड कॅबेज हे प्रमुख आकर्षण बनले आहे.
*सदर उपक्रमासाठी यांचे परिश्रम*
सदर उपक्रम यशस्वी यशस्वीपणे राबविण्यासाठी उद्यान विद्या विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका एस. एन.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम सत्राचे विद्यार्थी स्वराज मुंडे, आकाश कदम, निहाल पटेल, आकाश कोष्टी, शुभम शिंदे, तेजस चव्हाण, आशुतोष गोरे, रोहित उपासे, निलेश कांबळे, व्यंकटेश्वर रेड्डी, एम. जितेंद्र, श्रीणू जंगा तसेच विद्यार्थिनी रत्नाई वाघमारे, वैष्णवी माळी, कीर्ती पडवळ, धनश्री पडवळ, वैशाली पाटील या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केले. सदर प्रकल्प युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने उस्मानाबाद शहर व परिसरातील युवक व युवतीने प्रकल्पास भेट देऊन तांत्रिक प्रशिक्षण घेऊन अल्प खर्चात भाजीपाला उत्पादन व्यवसाय सुरू करावा असे आवाहन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पाटील के . एच. व उप प्राचार्य कानिफनाथ बुरगुटे यांनी केले आहे. तसेच वेळोवेळी महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा. घाडगे एच. एस. यांचे विद्यार्थ्यांना सहकार्य लाभले.
उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कीटकशास्त्र विभागाचे प्रा. गुरव पि.के. , वनस्पती शास्त्र विभागाचे प्रा. बुरगुटे के. ए., मृदा शास्त्र विभागाचे प्रा. सुतार एन. एस.,
कृषी विस्तार शिक्षण विभागाचे प्रा. डॉ. गांधले ए. ए. व प्रा शेटे डी. एस. कृषी अर्थशास्त्र विभागाच्या साबळे एस. एन. व प्रा. भालेकर एस. व्ही. यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी उपक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले.