ना.प्रा .डॉ तानाजीराव सावंत युवा मंच तर्फे देवीच्या भक्तांना अल्पोहार वाटप

0

ना.प्रा .डॉ तानाजीराव सावंत युवा मंच तर्फे देवीच्या भक्तांना अल्पोहार वाटप

भुम : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे  पालकमंत्री ना.प्रा. डॉ तानाजीराव सावंत व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत  यांच्या मार्गदर्शनाखाली ना.प्रा.डॉ तानाजीराव सावंत युवा मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आष्टी ते तुळजापूर पायी जात असलेले कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे आरधी भक्त भूम येथे आले असता यांना ना .प्रा .डॉ तानाजीराव सावंत युवा मंच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा युवासेना शहर प्रमुख प्रभाकर शेंडगे यांच्या वतीने  आराधी भक्ताना  केळी, चिक्कू, चहा, बिस्किटे, बिसलेरी पाणी  वाटप करण्यात आले. 

 यावेळी आराधी भक्तांनी आपल्या गायनातून आरोग्यमंत्री प्रा .डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वतीने  राज्यभर  होत असलेल्या विकास कार्याचा गवगवा पाउड मध्ये गावून सादर केला . यावेळी ना .प्रा .डॉ. तानाजीराव सावंत युवा मंच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा युवासेना शहर प्रमुख भुम प्रभाकर बाळासाहेब शेंडगे , प्रा. डॉ. तानाजीराव सावंत सोशल मिडिया चे मुकेश भगत पाटील,विकास बाबर,शरद बाराते,अमोल भसाड  व  ना.प्रा.डॉ. तानाजीराव सावंत युवा मंचाचे पदाधिकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top