आर्थिक फसवणूक करणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ!
उस्मानाबाद दि.३० (प्रतिनिधी) - ऊसतोड करण्यासाठी करार करून ३ लाख ७० हजार रुपये ऊसतोड कामगारांनी उचल घेतली. मात्र कराराप्रमाणे त्यांनी ऊस तोडणी केली नाही. तसेच घेतलेली उचल रक्कम वारंवार मागणी करुन देखील देण्यास टाळाटाळ करून फसवणूक केली आहे. तुळजापूर तालुक्यातील इटकळ पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करून घेण्यास संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश तक्रार दाखल करण्याचे आदेश तात्काळ द्यावेत अशी मागणी ऊस पुरवठा ठेकेदार संतोष लिंबाजी राठोड व दादासाहेब लिंबाजी राठोड यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे दि. ३० मे रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, उस्मानाबाद तालुक्यातील संतोष राठोड व दादासाहेब राठोड हे गेल्या १० ते १५ वर्षांपासून ऊस वाहतूक व ऊस पुरवठा ठेकेदारीचा व्यवसाय करीत आहेत. २०२२-२३ या गाळप हंगामामध्ये कळंब तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगर अलाईड या साखर कारखान्याबरोबर ऊसतोड कामगार पुरवठा करण्यासाठी करार करण्यात आलेला होता. त्यावेळी त्यांच्या संपर्कात व ओळखीचे असलेले भागवत पुंडलिक क्षीरसागर व त्यांची पत्नी रेश्मा, सत्यवान पांडुरंग शिरसागर व त्यांची पत्नी सुनीता तर मुलगा अक्षय सत्यवान शिरसागर रा दिंडेगाव पो काटगाव तसेच अरबळी येथील धनंजय रंगा वाघमारे व त्यांची पत्नी शामलबाई यांनी राठोड यांच्या वाहनावर ऊसतोड करण्याची इच्छा दाखवल्यामुळे ऊस तोडणी करण्यासाठी पैसे घेतलेल्या व्यवहारापोटी रजिस्ट्री नोटरीद्वारे करार करून धनंजय व शामल यांनी उचलेपोटी १ लाख रुपये तर भारत व रेश्मा यांनी १ लाख रुपये तसेच सत्यवान, सुनिता व मुलगा यांनी १ लाख ७० हजार रुपये उचल घेतली. ऊसतोड हंगाम संपेपर्यंत ते ऊस तोडण्यासाठी फडावर आलेच नाहीत. त्यामुळे घेतलेले पैसे परत देण्याची मागणी दिनांक 17 एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या गावी जाऊन केली असता सत्यवान क्षीरसागर यांचा सक्का भाऊ शिवाजी शिरसागर यांनी गावातील पाच ते सहा गाव बुलढाणा घेऊन धक्काबुक्की करून व चोरीचा तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली. याप्रकरणी तुळजापूर तालुक्यातील विटकर पोलीस स्टेशन मध्ये हजर होऊन बीड आमदार सोनवणे यांना याबाबत लेखी तक्रार दिली. मात्र त्यांनी ती तक्रार स्वीकारून घेतली नाही. तर तुम्ही आता गावी जा मी त्या ऊसतोड कामगारांना पोलीस स्टेशनला घेऊन येतो असे सांगितले. तोडीच्या कामासाठी म्हणून आर्थिक व्यवहार करून फसवणूक केलेल्या दाखल करण्याची वारंवार पोलीस स्टेशन येथे जाऊन मागणी केली. परंतू तक्रारी अर्जाचा कसल्याही प्रकारचा विचार केला गेला नसल्यामुळे ती तक्रार पोस्टच्या आरपीडीच्या माध्यमातून दाखल केलेली आहे. ती तक्रार संबंधित पोलीस स्टेशनला मिळालेली असून कर्मचाऱ्यांना वारंवार फोन द्वारे संपर्क करून गुन्हा दाखल करा अशी विनंती केली परंतु त्यांच्या स्तरावर उचल घेतलेल्या सर्व कामगारावर गुन्हे दाखल करण्याची त्यांना हाताशी धरून संगणक करून अद्याप संबंधितावर कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच संबंधित कामगारांनी माझ्याकडून घेतलेले पैसे वेळेत न दिल्यास मला कुटुंबासह सामुदायिक आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे संबंधितांवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश तात्काळ देण्यात यावेत अशी मागणी संतोष राठोड व दादासाहेब राठोड यांनी केली आहे.