शेळका धानोरा येथे महिला दिना निमीत्त तेरणा ट्रस्टच्या आरोग्य शिबीरात ४८० पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी व उपचार
उस्मानाबाद :
डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन शनिवार दि.२७ मे २०२३ रोजी, शेळका धानोरा, ता.कळंब येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात शेळका धानोरा व परिसरातील सर्व वयोगटातील ४८० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उदघाटन जेष्ट विश्वस्त अशोक भाऊ शिंदे व विजय आण्णा चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख उपस्थिती मा. जि.प. सदस्य सुरेश कोरे, ॲङ रवी शिंदे, उपसरपंच अभिजीत शिंदे, राम कसबे, प्रभाकर शेळके, ग्रा.प. सदस्य सिमा टेळे, राधा शेळके, रामचंद्र शेळके, कमलाकर इंगळे, मानिक सवासे, राम शेळके इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. कार्यक्रमाचो सुत्रसंचालन विजय गायकवाड सर यांनी केले. यावेळी मुंबईचे डॉ. अजित निळे, डॉ सुदर्शन निकम, डॉ. राशी कपडीया, डॉ. पुजा पै, डॉ. देवीका नायर, डॉ.निखील नैनानी यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे नामदेव शेळके, विनोद ओव्हळ, संदिप खोचरे, सचिन व्हटकर, रवी शिंदे, व उपकेंद्राचे डॉ. आकांक्षा पाटील, परिचारीका शिंदे आर. ए. विशाल सदाफुले व आशा कार्यकर्त्या सौ.भोसले. ए.डी, सौ. काळे. ए.बी, सौ. शेख वाय.एस. यांनी परीश्रम घेतले.