google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 मराठवाडा साहित्य परिषदेत तीन नवीन पदांची निर्मिती , उस्मानाबादमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव मंजूर

मराठवाडा साहित्य परिषदेत तीन नवीन पदांची निर्मिती , उस्मानाबादमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव मंजूर

0

मराठवाडा साहित्य परिषदेत तीन नवीन पदांची निर्मिती , उस्मानाबादमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव मंजूर

 उस्मानाबाद , दि. 29 -
धाराशिव येथे झालेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तीन ठरावांना एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. दोन सहकार्यवाह आणि एक उपाध्यक्ष या अशा तीन नवीन पदांनाही मंजुरी देण्यात आली. परिषदेच्या सभासदांच्या याद्यांची फेरदुरुस्ती करून लवकरच निवडणूक कार्यक्रम घेण्यात येईल, असेही यावेळी जाहीर करण्यात आले.
मराठवाडा साहित्य परिषदेची सर्वसाधारण सभा रविवारी धाराशिव येथील हॉटेल जत्राच्या सभागृहात पार पडली. मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला उपाध्यक्ष किरण सगर, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे, धाराशिव शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे, ज्येष्ठ लेखक शेषराव मोहिते, डॉ. रामचंद्र काळुंखे यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. प्रारंभी परिषदेच्या कार्यवाहीचा अहवाल ठाले पाटील यांनी वाचून दाखवला; तसेच मसभासदांच्या याद्यांची फेरदुरुस्ती झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल, असेही ठाले पाटील यांनी जाहीर केले.
सभेत नवीन घटनादुरुस्तीनुसार परिषदेत तीन नवीन पदांची निर्मिती करण्यात आली. संस्थेचे कार्यक्षेत्र मोठे असून, कामाचा व्याप वाढला आहे. त्यामुळे एक उपाध्यक्ष आणि दोन सहकार्यवाह अशी तीन पदे वाढविण्याच्या ठरावास एकमताने मंजुरी देण्यात आली. ही तिन्ही पदे औरंगाबाद जिल्हा वगळता इतर जिल्ह्यात कार्यरत राहणार आहेत, असेही या ठरावात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, सर्वसाधारण सभेसाठी सभासदांना पत्र पाठविले नसल्याचा आक्षेप काही सदस्यांनी उपस्थित केल्यानंतर सभासदांना पोस्टाद्वारे पाठविलेल्या पत्रांचा तपशील सभागृहासमोर सादर करण्यात आला. तांत्रिक अडचणींमुळे पत्र मिळाले नसेल, तर परिषदेची चूक नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या सभेला मराठवाडा विभागातील 168 सभासद उपस्थित होते. शेवटी आभार उपाध्यक्ष किरण सगर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top