google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद जिल्ह्यातील २७३७ शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचे रु. ७.६७ कोटी वितरीत - आमदार राणाजगजितसिंह पाटील

उस्मानाबाद जिल्ह्यातील २७३७ शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचे रु. ७.६७ कोटी वितरीत - आमदार राणाजगजितसिंह पाटील

0


उस्मानाबाद जिल्ह्यातील २७३७ शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचे रु. ७.६७ कोटी वितरीत - आमदार राणाजगजितसिंह पाटील

शिंदे-फडणवीस सरकारने तिसऱ्या टप्प्यातील प्रोत्साहन पर अनुदानची रक्कम रू. ५०,०००/- वितरित करण्यास सुरुवात केली असून या आठवड्यात जिल्ह्यातील २७३६ शेतकऱ्यांना रु. ७.६७ कोटी वितरित करण्यात आले आहेत. खरीप पेरणी पूर्वी शेतकऱ्यांना पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा होता. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या उर्वरित जवळपास ३४२४ पात्र लाभार्थीना देखील लवकरच रक्कम वितरित करण्यात येत आहे.  

महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान देण्याची घोषणा केली होती, मात्र अडीच वर्षात यासाठी कवडीचीही तरतूद तत्कालीन ठाकरे सरकारने केली नाही. शिंदे - फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर यासाठी रु. ४७०० कोटींची तरतूद करण्यात आली. राज्यातील जवळपास १४ लाख शेतकऱ्यांना हि रक्कम वितरित करण्यात येत आहे. आजवर उस्मानाबाद जिल्ह्यातील ४५२४८ शेतकऱ्यांचे आधार ई प्रमाणिकरण झाले असून यातील ४१८२४ शेतकऱ्यांना रु. १२३.३९ कोटी वितरित करण्यात आले आहेत.  शिंदे - फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कटिबद्ध असून सततच्या पावसाचे प्रलंबित अनुदान देखील शेतकऱ्यांना लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top