बालिका दिनानिमित्त जिल्हा बालसंरक्षण कक्षाने केली जनजागृती
धाराशिव,दि.4() बालिका दिनाचे औचित्य साधून जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने धाराशिव येथील मराठी कन्या शाळेत जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.हा कार्यक्रम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील अंकुश व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमामध्ये बालहक्क त्याचप्रमाणे मुलांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.बालविवाहाबाबत माहिती देण्यात आली.तसेच महिला व बाल विकास विभागाअंतर्गत बालकासंबंधीच्या विविध योजनांची व 1089 ची माहिती क्षेत्रीय कार्यकर्ता जयश्री पाटील व हर्षवर्धन सेलमोहकर यांनी दिली.
यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन करून बेटी बचाव बेटी पढाव या भितीपत्रिकेचे विमोचन केले.बालिका दिनानिमित्त पाचवी,सहावी,सातवी इयत्तेमध्ये प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या मुलींचा सत्कार करण्यात आला.बालिका दिनानिमित्त बालिकांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी मनोगत व्यक्त केले.मराठी कन्या शाळेमध्ये असलेल्या सर्व महिला शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी मराठी कन्या प्रशालेचे अध्यक्ष श्री.सोनार, संस्थेचे उपाध्यक्ष श्री.एडके,शाळेचे मुख्याध्यापक श्री.पिसाळ, सहशिक्षिका श्रीमती रावळे तसेच अन्य सहशिक्षकांनी सहकार्य केले.
****