भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांच्या जनजागृती सह रक्तदान व आरोग्य शिबीराचे आयोजन

0



भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांच्या जनजागृती सह रक्तदान व आरोग्य शिबीराचे आयोजन

 

उस्मानाबाद,दि.09(जिमाका):- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाअंतर्गत ज्येष्ठ नागरिक योजनांच्या जनजागृती संदर्भात मेळावे, आरोग्य तपासणी शिबाराचे आयोजन तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन आज करण्यात आले.  समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक अधिकार देणाऱ्या महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्यात येत आहे. या निमित्त राज्यासह जिल्हयामध्ये "भारतरत्न डॉ. बाबासाहेब सामाजिक समता कार्यक्रम" आयोजित करण्यात आले आहे. यात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून महामानवास सामाजिक न्याय विभागातर्फे अभिवादन केले जात आहे.

         आज ज्येष्ठ नागरिक योजनांच्या जनजागृती संदर्भात मेळावे, आरोग शिबीराचे आयोजन करण्यात करण्यात आले. तसेच जिल्हा आरोग्य विभागाच्या समन्वयाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद जिल्हा ज्येष्ठ नागरिक श्री. गोविंद अयाचीत, श्री.प्रभाकरराव चोराखळीकर आणि डॉ. श्री. संदिप तांबारे उपस्थित होते.

         या कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी श्री. दहिटणकर होते. तसेच समाज कल्याणचे सहायक आयुक्त बी.जी.अरावत, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी श्री.नाईकवाडी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांनी केले. श्री. दहिटणकर यांनी अध्यक्षीय भाषणात
ज्येष्ठ नागररिकांविषयी विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात एकूण 21 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच नागरिक व समाज कल्याण, कार्यालयातील कर्मचारी यांची आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली. कपिल थोरात यांनी आभार मानले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  युवराज भोसले, बप्पा नाईकनवारे, अमोल कातंगळे, रामभाऊ गुरव, रमेश वाघ यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top