रुईभर येथे कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न
उस्मानाबाद/रुईभर दि.11 - आज रोली ग्रामपंचायत कार्यालय रुईभर येथे सकाळी 10.30 वाजता गुरुदत्त पाणी वापर संस्था मर्या. रुईभर व पाटबंधारे विभाग उस्मानाबाद- 1 यांच्या संयुक्त विद्यमाने कालवा सल्लागार समितीची बैठक रुईभरचे सरपंच सौ. कल्याणी भगीरथ लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या कार्यक्रमास उस्मानाबाद पाटबंधारे विभाग -1 चे कार्यकारी अभियंता श्री. आवटे साहेब व उपविभागीय अधिकारी श्री. नाईकनवरे साहेब तसेच शाखा अभियंता श्रीमती माने मॅडम यांनी पाणी वापर संस्थेच्या सभासदांना मार्गदर्शन करुन पाण्याचे महत्व पटवून दिले. पाणी हेच जीवन आहे व पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी शेतीस ठिबक पद्धत अवलंबण्याचे आवाहन केले. तसेच पाणी वापर संस्थेच्या सभासदांना वेळेवर पाणीपट्टीचा भरणा करुन संस्थेस सहकार्य करण्याबाबत मार्गदर्शन केले व या कार्यक्रमास कालवा निरीक्षक श्री. पटेल साहेब, कुलकर्णी साहेब, शेळके साहेब यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. पटेल साहेब यांनी केले तसेच या कार्यक्रमास गुरुदत्त पाणी वापर संस्थेच चेअरमन श्री. सुब्रााव अण्णा लोमटे पाटील यांनी पाणी पट्टीचे दर व भरणा याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सुरज जाधव, सुधीर गव्हाणे, भगिरथ लोमटे, गणेश पवार, श्रीकांत लोमटे, बाबासाहेब गडकर, देविदास कोळगे, पठाण सर, ह.भ.प. तानाजी महाराज भोयटे, ह.भ.प. जगन्नाथ गव्हाणे महाराज व खामसवाडीचे चेअरमन पोपटराव भोसले हे या कार्यक्रमास उपस्थित होते व शेवटी संस्थेचे व्हा. चेअरमन सुरज जाधव यांनी सर्वाचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले.