मान्सूनपुर्व पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
उस्मानाबाद : काल दि. 29/05/2023 व 30/05/2023 रोजी उस्मानाबाद तालुक्यात अनेक ठिकाणी बोरगांवराजे आणि बोरखेडा याठिकाणी मान्सूनपुर्व पावसामुळे तसेच वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. बोरगांवराजे आणि बोरखेडा येथे खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दोन्ही गावामध्ये जाऊन झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच मान्सूनपुर्व पावसाने झालेल्या घराच्या नुकसानीचे तसेच शेतीतील उन्हाळी पिके व फळबागांचे तात्काळ पंचनामे करणेबाबत सुचना दिल्या. मान्सूनपुर्व पावसामुळे बोरखेडा व परिसर तसेच बोरगावराजे व परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाहणी करतेवेळी धाराशिव तहसिलचे नायब तहसिलदार ढवळे साहेब, मंडळ अधिकारी जांभळधरे मॅडम, तलाठी रोडगे,डोके लाकाळ व जावळे साहेब, ग्रामसेवक भोसले, कृषी विभागाचे तिर्थकर साहेब, आदि. अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
तसेच बोरगावराजे व बोरखेडा येथे नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.