google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद जिल्ह्यात दोन ठिकाणी चोरी गुन्हे दाखल, बस मध्ये चढताना ६४ ग्राम सोन्याचे दागिने लंपास

उस्मानाबाद जिल्ह्यात दोन ठिकाणी चोरी गुन्हे दाखल, बस मध्ये चढताना ६४ ग्राम सोन्याचे दागिने लंपास

0



उस्मानाबाद जिल्ह्यात दोन ठिकाणी चोरी गुन्हे दाखल, बस मध्ये चढताना ६४ ग्राम सोन्याचे दागिने लंपास


आनंदनगर पोलीस ठाणे : हानुमान चौक, बार्शी रोड उस्मानाबाद येथील- माधवी रंगनाथ घोंगडे या दि.26.05.2023 रोजी 12.30 वा. दरम्यान उस्मानाबाद बसस्थानक येथे माजलगाव ते सोलापूर बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने माधवी यांचे पर्सची चैन खोलून पर्स मधील अंदाजे 1,67,200 ₹ किंमतीचे 64 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे चोरुन नेले. अशा मजकुराच्या माधवी घोंगडे यांनी दि. 26.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

नळदुर्ग पोलीस ठाणे : सराटी, ता. तुळजापूर येथील- अभिमान रामचंद्र बरगडे यांचे अंदाजे 56,000 ₹ किंमतीचे 14 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे व  चांदीचे दागिणे हे दि.25.05.2023 रोजी 21.00 ते दि.26.05.2023 रोजी 03.30 वा. सु. बरगडे यांचे कुडाचे घरातील खुंटीला अडकवून ठेवलेल्या कॅरीबॅगमधील अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या अभिमान बरगडे यांनी दि.26.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top