google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार सेलमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार सेलमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

0
काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार सेलमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

उस्मानाबाद-
काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार सेलमध्ये उस्मानाबाद व तुळजापूर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यानी जाहीर प्रवेश घेतला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,   रोजगार व स्वयंरोजगार सेलचे प्रदेशाध्यक्ष  योगेश मसलगे  पाटील,  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.धीरज पाटील, माजी जिल्हाध्यक्ष विश्वासआप्पा शिंदे व काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष अहमद चाऊस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या प्रवेश सोहळ्यास काँग्रेसचे जिल्हा संघटक राजेंद्र शेरखाने, जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष अहमद चाऊस, मानवाधिकार विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर लोंढे, उपाध्यक्ष अभिमान पेठे, अशोक बनसोडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात नूतन पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यामध्ये काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार सेल शहर उपाध्यक्षपदी शाकीख शेख, शहर उपाध्यक्ष जमीर सय्यद, संघटक महमूद इब्राहीम शेख, तुळजापूर तालुकाध्यक्षपदी अकबर शेख, उपाध्यक्ष रोहीत शिंदे यांची निवड करण्यात आली. कार्यक्र्मात हनुमंत धनके, सचिन केदार, महंमद शेख, हुसेन पिंजारी, बब्रुवान मेहकर, वरवंटी येथील फिरोज कचरू शेख, अल्लानूर शेख, गफार शेख, मोहियोद्दीनखान पठाण, नंदकुमार जमदाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार सेलमध्ये जाहीर प्रवेश घेतला. प्रवेश घेतलेल्या सर्वांचे काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष अहमद चाऊस यांनी स्वागत केले. यावेळी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top