google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 स्वातंत्र्य सैनिकांच्या मेळाव्याचे यशस्वी आयोजन , स्वातंत्र्य सैनिकांच्या आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय पथक गावपतळीवर उपलब्ध करून देणार : डॉ. सचिन ओम्बासे

स्वातंत्र्य सैनिकांच्या मेळाव्याचे यशस्वी आयोजन , स्वातंत्र्य सैनिकांच्या आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय पथक गावपतळीवर उपलब्ध करून देणार : डॉ. सचिन ओम्बासे

0


स्वातंत्र्य सैनिकांच्या मेळाव्याचे यशस्वी आयोजन , स्वातंत्र्य सैनिकांच्या आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय पथक गावपतळीवर उपलब्ध करून देणार : डॉ. सचिन ओम्बासे

 

                उस्मानाबाद,दि.26( प्रतिनिधी ):- स्वातंत्र्य सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्य सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला .

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक भास्करराव नायगावकर, बुबासाहेब जाधव, शेषेराव बनसोडे, कलावती वसंत उंबरे, नामदेव माने, तानाजी अंबुरे, सोजरबाई नलावडे, समाजसेविका शिला उंबरे तसेच इतर ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                 स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना शासकीय नोकर भरतीपुर्वी 10 टक्के समांतर आरक्षण देण्यात यावे, स्वातंत्र्य सैनिक हा राज्य किंवा प्रांताचा नसून सबंध देशाचा असतो तेव्हा राज्य व केंद्र असा पेन्शन भेदभाव न करता राज्यशासन व केंद्रशासनाने स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारस विधवांना एकसमान पेन्शन व संबंधित योजनेचा लाभ देण्यात यावा, स्वातंत्र्य सैनिकांसाठी स्वतंत्र भवन उभा करण्यात यावे, घराच्या पडझडीसाठी 25 लाखांची तरतूद करण्यात यावी, दवाखान्याचा खर्च 10 हजार रुपयांवरुन 5 लाख रुपयांपर्यंत करण्यात यावा, ज्या स्वातंत्र्य सैनिकांना घरे नाहीत अशांना म्हाडामध्ये घरे देण्यात यावी, अंत्यविधीसाठी 25 हजार रुपयांची तरतूद करण्यात यावी, ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या विधवांना पेन्शन मिळाली नाही त्यांना पेन्शन मिळावी, संबंधित नगर (गल्ली) व घरांवर स्वातंत्र्य सैनिकांचे नाव टाकण्यात यावे अशा विविध स्वरुपाच्या मागण्या स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या पाल्यांनी यावेळी केल्या.

                स्वातंत्र्य सैनिकांच्या मागण्या, समस्या तसेच त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे म्हणाले की, ज्या अडी-अडचणी जिल्हा स्तरावर ज्या शासकीय योजनेतून सोडवता येतील त्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. स्वातंत्र्य सैनिकांच्या आरोग्य तपासणीसाठी गावपतळीवर आरोग्य तपासणीचे पथक पाठवून त्यांची दरमहा वैद्यकीय तपासणी करून कोणत्या योजनेतून त्यांना वैद्यकीय सुविधेचा लाभ देता येईल याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही यावेळी डॉ.ओम्बासे म्हणाले.

                तत्पूर्वी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकाशित करण्यात आलेले “वैभवशाली उस्मानाबाद” या जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे आणि निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top