जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या तालुका कार्यकारणीची निवड; कार्याध्यक्षपदी गुंडाळे, सचिव सय्यद
उस्मानाबाद : जिल्हा मराठी पत्रकार संघाची तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली.जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली व कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, सहसचिव संतोष जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे..
जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या धाराशिव तालुका कार्याध्यक्षपदी प्रशांत गुंडाळे, सचिवपदी शाहरुख सय्यद ,उपाध्यक्षपदी सुरेश तर बापू नाईकवाडी यांची संघटकपदी नियुक्ती करण्यात आली.
सहसचिव सागर ढोणे, सहसंघटक विजयकुमार कानडे , सदस्य आसिफ सय्यद, सदस्य- मन्सूर सय्यद , सदस्य जयराम चव्हाण , सदस्य मुबारक शेख , सदस्य गणेश माळी , सदस्य परमेश्वर वाघमारे, सदस्य इर्शाद मुलानी , सदस्य सुहास शिंदे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष संतोष हंबीरे तर नवनियुक्त कार्यकारिणीची घोषणा सरचिटणीस संतोष जाधव यांनी केली.
पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
नूतन कार्यकारिणीचे जिल्हाभर स्वागत होत आहे.