google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 तेलंगणा राज्याच्या पोलीसांप्रमाणे महाराष्ट्र पोलीसांना सुद्धा सुविधा मिळवून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार - प्रमोद वाघमारे

तेलंगणा राज्याच्या पोलीसांप्रमाणे महाराष्ट्र पोलीसांना सुद्धा सुविधा मिळवून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार - प्रमोद वाघमारे

0

तेलंगणा राज्याच्या पोलीसांप्रमाणे महाराष्ट्र पोलीसांना सुद्धा सुविधा मिळवून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार - प्रमोद वाघमारे

नागपूर येथे पोलीस बॉईज असोसिएशनच्या राज्यस्तरीय बैठकिमधे झाला निर्णय

नागपूर / प्रतिनिधी / : तेलंगणा राज्याच्या पोलीसांप्रमाणे महाराष्ट्र पोलीसांना सुद्धा सुविधा मिळवून देण्यासाठी व त्यांचे कुटुंबीय तसेच महाराष्ट्र होमगार्ड यांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस बॉईज असोसिएशनचा लढा आणखीन तीव्र करणार असल्याचे पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. दिनांक 24 / 05 / 2023 रोजी नागपूर येथील SRPF गट क्रमांक  2 येथे ही बैठक पार पडली*

*या बैठकीला उस्मानाबाद , सोलापूर , सांगली , कोल्हापूर , रायगड , पुणे , मुंबई , ठाणे , पालघर , अहमदनगर , बीड , जालना , औरंगाबाद , नांदेड , यवतमाळ , चंद्रपूर , गडचिरोली , अकोला , अमरावती , बुलढाणा , नंदुरबार , जळगाव , धुळे ,नागपूर , अशा प्रकारे राज्यभरातून सुमारे 28 जिल्ह्यांचे पुरुष व महिला आघाडी जिल्हाध्यक्ष यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये बोलताना प्रमोद वाघमारे पुढे म्हणाले की आज पोलीसांच्या विविध प्रकारच्या समस्या आहेत , ज्याकडे महाराष्ट्र सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे, पोलीसांचा फक्त कामापुरता वापर करून घेतला जात आहे, त्यांना कसल्याही प्रकारच्या सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत त्यांच्यावर 24 तास कामाचा लोढ दिला जात आहे, रात्री अपरात्री कधीही काम केल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनेक पोलीस बांधवांचा हृदयरोगाने मृत्यु झालेला आहे*

*पोलीस बांधवांना राहण्यासाठी घरांची पडझड झालेली आहे, याकडे सुद्धा सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे, यांसारख्या अनेक गोष्टींमुळे पोलीस कुटुंबीय हे चिंताग्रस्त असून आपल्या समस्या कधी सुटणार याची वाट पाहत आहे. आणि म्हणून महाराष्ट्र पोलीसांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस बॉईज असोसिएशनचा लढा आणखीन तीव्र करणार असल्याचे प्रमोद वाघमारे यांनी सांगितले*

*संपूर्ण महाराष्ट्रभर पोलीसांची ड्युटी आठ तासांची करण्यात यावी , पोलीसांना चांगल्या प्रकारच्या व वेळेवर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या , सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना मोफत आरोग्य सुविधा मिळाव्या , महाराष्ट्र होमगार्ड कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे , तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीसांना सुद्धा पेमेंट देण्यात यावी , पोलीसांच्या पाल्यांना पोलीस भरती मधे 10 % आरक्षण देण्यात यावे , यांसारखे महत्वाचे अनेक विषय प्रमोद वाघमारे यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवले*

*या बैठकीमध्ये पोलीस सेवेतून सेवानिवृत्त झालेले अनेक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांची उपस्थिती होती, त्यांनी देखील आपल्या भाषणामध्ये बोलून दाखवले की, आज पोलीसांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी प्रमोद वाघमारे आणि त्यांची पोलीस बॉईज असोसिएशन अतिशय चांगले आणि महत्वाचे काम करीत असून भविष्यात याची खूप गरज असून संपूर्ण महाराष्ट्रभर पोलीस परिवारातील सदस्यांनी एकत्र येऊन प्रमोद वाघमारे यांचे हात बळकट करून पोलीस बॉईज असोसिएशन मधे सहभागी झाले पाहिजे , प्रमोद वाघमारे यांची पोलीसांबद्दल असलेली तळमळ व आत्मीयता पाहून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी हे सुद्धा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांनी सांगितले*

*नागपूर येथील झालेल्या या राज्यस्तरीय बैठकीत नागपूर जिल्हाध्यक्ष पदी राकेश करंडे , अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी नौशाद शेख , जालना जिल्हाध्यक्ष पदी सचिन भाऊ राठोड , नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी दीपक भाऊ कपूर , अमरावती महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी सौ.नंदाताई राऊत , अकोला महिला जिल्हाध्यक्ष पदी सौ.सरिता ताई श्रिवाल यांची नियुक्ती करण्यात आली*

*प्रमोद वाघमारे पुढे म्हणाले की लवकरच संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करून पोलीस बॉईज असोसिएशनचे कार्य प्रत्येक पोलीस परीवारापर्यंत पोहोचवून त्या परिवारातील किमान दोन सदस्य पोलीस बॉईज असोसिएशन मधे सहभागी करून घेणार आहे आणि महाराष्ट्र पोलीसांचे व त्यांच्या कुटुंबियांचे जो पर्यंत प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत पोलीस बॉईज असोसिएशनचा हा लढा अविरतपणे सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top