google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 पोलीस दलातील बँड पथक आणि ऑर्केस्ट्रा पुन्हा सुरु करा , बहुजन योद्धा संघटनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

पोलीस दलातील बँड पथक आणि ऑर्केस्ट्रा पुन्हा सुरु करा , बहुजन योद्धा संघटनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

0

पोलीस दलातील बँड पथक आणि ऑर्केस्ट्रा पुन्हा सुरु करा , बहुजन योद्धा संघटनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन 

उस्मानाबाद : जिल्हा पोलीस दलातील बॅन्ड पथक कार्यान्वित करून ऑर्केस्ट्रा सुरू करण्यात यावा अशी मागणी बहुजन योद्धा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा पोलीस दलातील पोलीस बॅन्ड पथक हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. पोलीस कर्मचार्‍यांमधील शिस्तबद्ध संचालन आणि सुरेल वाद्यवृंद हे नेहमीच उस्मानाबाद जिल्हावासीयांचे आकर्षण राहिलेले आहे. यापूर्वी जिल्हा पोलीस दलातील बॅन्ड पथक हे सार्वजनिक कार्यक्रमांकरिता देखील नाममात्र शुल्क आकारून घेतले जायचे. त्यासोबतीला ऑर्केस्ट्रा सुरू केल्यास पोलीस कर्मचार्‍यांच्या कलागुणांना वाव मिळून कामकाजाच्या तणावातून त्यांचे मानसिक संतुलन राखण्यास मदत होऊ शकणार आहे. 

पोलीस दलातील बॅन्ड पथकाच्या कलागुणांना देखील पुरेसा वाव मिळावा, त्यासोबतीने ऑर्केस्ट्रा सुरू झाल्यास इतर पोलीस कर्मचार्‍यांना देखील आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळू शकणार आहे. त्याचबरोबर कामकाजामुळे येणार्‍या तणावातून त्यांची मुक्तता होऊन सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचे मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहू शकते. त्यामुळे त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पुन्हा पोलीस बॅन्ड पथक विशिष्ट शुल्क आकारून उपलब्ध करुन देण्यात यावा, त्याचबरोबर ऑर्केस्ट्रा देखील सुरू करण्यात यावा. या माध्यमातून मिळणारी रक्कम पोलीस कल्याण निधीसाठी वापरता येऊ शकेल. जेणेकरून पोलीस कर्मचार्‍यांच्या कल्याणासाठी सदरील निधी उपलब्ध होण्यासाठी आणखी एक पर्याय मिळू शकणार आहे. तरी मागणीचा विचार करून पोलीस बॅन्ड पथक पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध करुन देण्यात यावे, त्याचबरोबर ऑर्केस्ट्रा सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी शिंगाडे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top