उस्मानाबाद शहरात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल , होलसेल गुटखा विक्रेत्यावर कारवाई कधी?
उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे :दि.25.05.2023 रोजी पोलीस निरीक्षक- शेख उस्मानाबाद पोलीस ठाणे यांना 13.30 ते 13.45 वा. सु. गोपनीय माहिती मिळाली की, उस्मानाबाद येथील आठवडी बाजार उस्मान पान टपरी मध्ये एक इसम महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ गोवा गुटख्याच्या पुड्या अवैध्य विक्री करत आहे. यावर पथकाने लागलीच सदर ठिकाणी जाउन नमूद इसमास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव- अथर मुस्तफा कुरेशी रा. गालीब नगर उस्मानाबाद असे सांगून त्याच्या कडे अधीक चौकशी केली असता त्यांने उडवा उडवीची उत्तर दिल्याने पथकाने सदर दुकानाची पाहणी केली. त्यामध्ये तंबाखु पॉकेट, 2 जाफराणी जर्दा पॉकेट 01 असा एकुण 438 ₹ किंमतीचा गुटखा साठवण करुन सदरचा गुटखा विक्री करण्यासाठी पानटपरी मध्ये ठेवलेला मिळून आला. तर उमर मोहल्ला, उस्मानाबाद येथील- सलमान रफीक शेख यांचे घरा समोरील पान टपरीमध्ये जाफरानी जर्दा पुड्या, तंबाखु पुड्या, हिरव्या गोव्याच्या पुड्या, बादशाहा गुटखा पुड्या, लाल गोवा असा एकुण- 484 किंमतीचा गुटखा साठवण करुन सदरचा गुटखा विक्री करण्यासाठी पानटपरी मध्ये ठेवलेला मिळून आला. तसेच जुनी गल्ली, उस्मानाबाद येथील- गोविंद शिवाजी सुर्यवंशी यांनी याच दिवशी बेंबळी टी कॉर्नर रोडचे बाजूला असलेली साईराज पानटपरी मध्ये रॉयल कंपनीच्या तंबाखुच्या पुड्या, गोवा पान मसाला, बाबाजी पान मसाला, गोवा हिरवा रंगाच्या सुगंधीत पान मसाला, माणिकचंद पान मसालाच्या पुड्या, एम. सी. सेंटेड तंबाखुच्या पुड्या असा एकुण 1,836 ₹ किंमतीचा माल मिळून आल्याने महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ गोवा गुटख्याच्या पुड्या असलेली पुडके असा एकुण 2,758 ₹ किंमतीचा माल त्याचा सविस्तर पंचनामा करुन माल जप्त करुन ताब्यात घेउन गुटखा विक्री करणारे अथर कुरेशी, सलमान शेख, गोविंद सुर्यवंशी यांचेविरुध्द भा.दं.सं. कलम- 272, 273, 188 आंतर्गत गुरंन 179/2023, 180/2023 व 181/2023 असे तीन गुन्हे उस्मानाबाद शहर पो.ठा. येथे 25.05.2023 रोजी नोंदवले आहेत.
सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नवनित कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रो पोलीस उपअधीक्षक दुधाणे, उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी- शेख, उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्या पथकाने केली.
'उस्मानाबाद शहरात छोटी टपरी चालक यांच्यावर गुटखा विक्री करताना पोलिसांनी कारवाई केली आहे मात्र होलसेल गुटखा विक्रेते यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे अशी चर्चा सध्या शहरात होत आहे शहरातील मुख्य होलसेल गुटखा विक्रेते यांच्यावर कारवाई कधी होणार असा देखील प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत '