तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष आणि माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
उस्मानाबाद (०१.०६. २०२३) येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंहजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. ट्रस्ट च्या वतीने दिव्यांग बंधू भगिनींना सायकल वाटप करण्यात आले त्याप्रसंगी ट्रस्टच्या विश्वस्त सह आ. राणाजगजीतसिंहजी पाटील ,व व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे यांची प्रमुख उपस्थिती होते.
तसेच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये जिल्हा शासकीय रुग्णलाय, उस्मानाबाद ब्लड सेंटर च्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थी आणि स्टाफ यांनी रक्तदान केले. तसेच यावेळी महाविद्यालयाच्या आवारामध्ये वृक्षारोपणही करण्यात आले व शासकीय स्त्री रुग्णालय,उस्मानाबाद येथे नारळपाणी वाटप करण्यात आले.या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विक्रमसिंह माने ,डॉ. डी डी दाते, डॉ.प्रशांत कोल्हे ,डॉ. एन एस तौर ,प्रा सुजाता गायकवाड ,प्रा.शीतल पवार ,प्रा. यांची प्रमुख उपस्थिती होती.